Ad will apear here
Next
खाडे विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात


ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या ग. वि. खाडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष जयवंतभाऊ देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी सचिव विद्या वेखंडे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सचिव वि. अ. शेनॉय, मुख्याध्यापक एम. एस. पवार उपस्थित होते. या स्पर्धेत पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी कबड्डी, धावणे, आदी विविध क्रीडा प्रकारांत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्पर्धेनंतर लगेचच विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZJIBV
Similar Posts
शहापुरात वसुंधरा संजीवनी मंडळ बांधणार ‘चेक डॅम्स’ ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ब्रम्हलीन योगी ऋद्धीनाथबाबा सत्संग परिवाराचे प्रणेते योगी फुलनाथबाबांच्या ‘पाणी अडवा’ मोहिमेची दखल घेत ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळ या सामाजिक संस्थेने सत्संग परिवाराने श्रमदानातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांच्या जागी पक्के चेक डॅम्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे
‘कॉमनवेल्थ’साठी सुष्मिता देशमुखची भारतीय संघात निवड ठाणे : केरळमध्ये आयोजित केलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत विटावा येथील सुष्मिता सुनील देशमुखने ४७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. तिच्या या कामगिरीमुळे आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड होणार आहे.
पडवळपाडा केंद्रशाळेला मिळाले आयएसओ मानांकन ठाणे : शहापूर तालुक्यातील पडवळपाडा या जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. ही ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची दुसरी व शहापूर तालुक्यातील पहिली ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शाळा ठरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दाभोळकर यांची निवड ठाणे : वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धा लिलया जिंकणारे संजय दाभोळकर यांची युरोप येथे होणार्‍या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २० ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत युरोपमधील जी स्लोवोकिया शहरात बेंचप्रेस डेडलिफ्ट पॉवरलिफ्टिरंग स्पर्धा होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language